मोबाईलवर सहज पगार स्लिप डाउनलोड करणे.

                                                         

                                Salary slip


आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या Salary slip ( पगार पत्रक) ची आवश्यकता असते. आपले पगार पत्रक मोबाईलवरून सहज डाउनलोड करता येईल. यासाठी खालील प्रोसेस जरा. जसे एखादे लोन घेताना असो किंवा इतर कामासाठी. मग आपल्याला स्लिप लवकर मिळण्यासाठी अडचणी यायच्या. पण आता आपल्याला 2019 पासूनच्या प्रत्येक महिन्यांची Salary Slip आता ऑनलाईन पाहता येईल व डाउनलोड ही करता येईल. यासाठी खालील वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.

https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp


यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा शालार्थ ID (पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID) जो 02DED ने सुरू होतो तो आवश्यक आहे. यासाठी खालील प्रमाणे प्रोसेस करा. यासाठी ifms123 हा Default पासवर्ड आहे.



जर पासवर्डने लॉगिन होत नसेल तर आपल्या मुख्याध्यापक ( शाळेच्या ) लॉगिन मधून पासवर्ड रिसेट करता येईल. खालील फोटोत पाहता येईल.




खालील फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे आपला पासवर्ड शालार्थ आय डी टाकून रिसेट करा. शालार्थ आय डी टाकल्यावर आपले नाव येईल. ते बरोबर असल्याची खात्री करा.





पासवर्ड रिसेट केल्यानंतर Default पासवर्ड ifms123 पासवर्ड मिळेल. यानंतर परत आपल्याला शालार्थ वेबसाईटवर येऊन आपला शालार्थ ID व वरील पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल. खालीलप्रमाणे प्रोसेस करा.



शालार्थमध्ये लॉगिन झाल्यानंतर आपणास खालीलप्रमाणे पासवर्ड सेट करावा लागेल. पासवर्ड इतरांशी शेअर करू नका. पासवर्ड सेट करताना अक्षरे, सांकेतिक चिन्हे व अंक यांचा वापर करून स्ट्रॉंग पासवर्ड बनवा. खलील फोटोमध्ये प्रोसेस पहा आपल्या लक्षात येईल.



आपण तयार केलेल्या पासवर्डने परत एकदा लॉगिन करा.





यानंतर आपल्याला एकच टॅब दिसेल त्यावर क्लिक करा. खालील फोटोत दाखविल्याप्रमाणे प्रोसेस करा.





यानंतर आपले नाव समोर येईल. त्याखाली आपल्याला वर्ष व महिना निवडायचा आहे. त्यानंतर view slip यावर क्लिक करा. निवडलेल्या महिन्याची आपल्याला salary slip दिसेल. ती सेव्ह करा किंवा प्रिंट काढा. यावर कोणाचीही सही न घेता आपल्याला बँकेत किंवा इतर ठिकाणी वापरता येईल.



   अशा पद्धतीने आपण सहज मोबाईल वरून आपली salary स्लिप डाऊनलोड करू शकतो. अशाच उपयुक्त माहितीसाठी वेबसाईटला भेट देत रहा.


Disclaimer :- सदरील माहिती व लिंक शिक्षकांना सहज उपलब्ध व्हावी, समजावी या हेतूने ठेवलेली आहे.




Post a Comment

2 Comments