जागतिक महिला दिन विशेष - international woman day

जागतिक महिला दिनानिमित्त भारतातील महान माउलींची माहिती जाणून घ्या. 




"ज्याला स्त्री 'आई' म्हणून कळली, 

तो जिजाऊचा शिवबा झाला, 

ज्याला स्त्री 'बहिण म्हणून कळली 

तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, 

ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणून कळली, 

तो राधेचा श्याम झाला, आणि 

ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली, 

तो सीतेचा राम झाला !'


                            

8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच.... कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला जातो, असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात, उत्साहात साजरा केला जातो.



महान माउलींच्या कार्याची माहिती जाणून घेण्यासाठी चित्रावर क्लिक करा. 
अनु.क्र.                     महान माउली डाऊनलोड करा. 
1राजमाता जिजाऊ 
2सावित्रीबाई फुले 
3अहिल्याबाई होळकर 
       झाशीची राणी लक्ष्मीबाई 
5कल्पना चावला 
6 सिंधुताई सपकाळ 
7 मदर तेरेसा 

8 किरण बेदी 
9इंदिरा गांधी 
10 लता मंगेशकर 


महान माउलींच्या माहितीसाठी विकिपीडिया वरील उपलब्ध  करून देण्यात आलेली आहे. 


आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे होय.

आज पुरुषांबरोबर स्त्रियादेखील सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत, परंतु आजदेखील स्त्री सुरक्षित नाही, हे खेदाने बोलावेच लागेन. लैंगिक शोषण, अत्याचार, हुंडाबळी, भृणहत्या या गोष्टींमुळे स्त्रियांच्या मुलींच्या मनात भीतीची, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मुलीचा जन्म झाल्या वर तिचा तिरस्कार केला जातो, स्त्रीयांचा अपमान किला जातो. स्त्री-पुरुष समानता ही आचरणात आणायला हवी, शेवटी एवढेच म्हणेन की, 

"तुझ्या प्रयत्नांना मिळू दे, यशाची सोनेरी किनार 

"तुझ्या प्रयत्नांना मिळू दे, यशाची सोनेरी किनार, 

लक्ष दिव्यांनी उजळू दे, तुझा संसार : कर्तत्व आणि 

सामर्थ्याची ओढून ये नवी झालर, 

स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर !!"


जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी इथे क्लिक करा. 

Post a Comment

0 Comments