पुनर्रचित सेतू अभ्यास दिवस – पंधरावा l इयत्ता – सहावी l 30-days-Setu-Bridge-Course-SCERT

 






इयत्ता - सहावी 

दिवस - पंधरावा      


दररोजचा सेतू अभ्यास आपल्याला सहज कृतीपात्रिका उपलब्ध व्हाव्यात या हेतून इथे वर्ग व विषयनिहाय उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना संबंधित कृतीपात्रिका सोडविताना काही अडचण असल्यास आपल्या शिक्षकांशी किवा पालकांशी विचारावे. दररोजचा सेतू अभ्यास सहज व सोप्या पद्धतीने डाउनलोड करून वापरण्यासाठी आपल्याला इथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचे सर्व अधिकार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडे आहेत. 


 

 

 महत्वाचे :- सेतू अभ्यास पूर्वचाचणी प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. 



 

सदरील इयत्ता  PDF डाउनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE बटनाला क्लिक करा. 



इयत्ता २ री ते १० विचा दररोजचा सेतू अभयस डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. 



राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण २०१९ नुसार भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयात राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक पटली कमी दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यामध्ये इयत्तानिहाय व विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. राज्यस्तरावरून शाळा बंद पण शिक्षण सुरु या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची शिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून सुरु रहावे याकरिता विविध उपक्रम राबवण्यात येत असून विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययन रऱ्हास भरून काढण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यस्तरावर विकसीत केलेल्या ४५ दिवसांच्या सेतू अभ्यासाची अमलवजावणी करण्यात आली होती. सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरु झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये देखील सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

 महत्वाचे :- सेतू अभ्यास पूर्वचाचणी गुणनोंद तक्ते  डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. 

पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप :-

      १)    इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, विज्ञान, गणित व सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

      २)    सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या क्षमतांवर आधारित आहे.

     ३)    पुनर्रचित सेतू अभ्यास हा तीस दिवसाचा असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपात्रिका देण्यात आल्या आहेत. तसेच सदर अभ्यास मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे.

     ४)    सदर पुनर्रचित अभ्यासाच्या अंमलबजावणी विषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

     ५)    सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपात्रिका या विद्यार्थी केंद्रित, कृती केंद्रित तसेच अध्यन निष्पत्तीवर आधारित आहेत. विध्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन करू शकतील असे त्यांचे स्वरूप आहे. तसेच अधिक समृद्धतेकरिता साहित्याच्या लिनक्स देखील देम्यात आलेल्या आहेत.  

      ६)    सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील या प्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे.

       ७)    पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्वचाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उत्तर चाचणी दिनांक २३ जुलै २०२२ किंवा दिनांक ६ ऑगस्ट २०२२ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.


पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी :-

पूर्वचाचणी :- 

राज्यातील शाळा – १७ व १८ जून २०२२

 विदर्भातील शाळा – १ व २ जुलै २०२२

 

३० दिवस सेतू अभ्यास :- 

राज्यातील शाळा – २० जून २०२२ ते २३ जुलै २०२२

      विदर्भातील शाळा – ४  जुलै २०२२ ते ६ ऑगस्ट २०२२

 

उत्तर चाचणी :- 

राज्यातील शाळा – २५ व २६ जुलै २०२२

      विदर्भातील शाळा – ८ ते १० ऑगस्ट लै २०२२ 




         Disclaimer :- सदरील पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम निर्मितीचे सर्व अधिकार राज्य शैक्षणिक संशोधंव प्रशिक्षण परिषद पुणे यांचे आहेत. सदर सेतू अभ्यास शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण सुलभरीत्या देता यावे या हेतूने एकत्रित केलेला आहे.


Post a Comment

0 Comments