शाळा पूर्व तयारी - विद्याप्रवेश
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार देशातील
सर्वच बालकांनी २०२६-२७ पर्यंत प्राथमिक स्तरावर पायाभूत साक्षरता व संख्यात्मक
कौशल्ये प्राप्त करणे हे शालेय शिक्षण व्यवस्थेसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे.
यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान
प्राप्तीसाठी “NIPUN BHARAT” हे अभियान सुरु करण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत
इयत्ता १ ली मध्ये प्रवेशित सर्व बालकांसाठी शैक्षणिक वर्षतील पहिले १२ आठवडे म्हणजेच
३ महिने बालकांच्या शाळा पूर्व तयारीसाठी “विद्याप्रवेश” हा कार्यक्रम घेणे
निश्चित करण्यात आलेले आहे.
पूर्व
प्राथमिक शिक्षण घेऊन इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित होणारे बालक औपचारिक शिक्षण
प्रक्रियेतील या महत्वाच्या टप्प्यावर आता नवनवीन विषय शिकणारे असत, नवीन कौशल्ये
प्राप्त करणारे असते. औपचारिक शिक्षण घेण्यापूर्वी बालकाची काही बाबतीत पूर्वतयारी
होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने औपचारिक शिक्षण प्रक्रियेतील वाचन, लेखन व गणित
शिकण्याची त्याची पूर्व तयारी होणे गरजेचे असते. सर्वसाधारण हि पूर्वतयारी अंगणवाडी
किंवा बालवाडीमध्ये करून घेतली जात. पण पहिलीमध्ये येणारी काही बालके हि बालवाड्यामधून
येतात तर काही बालके असा कोणताच अनुभव न घेता येतात. त्यामुळे प्रत्येक बालकाची
पूर्व तयारी वेगवेगळ्या पातळीवर असू शकते. अशा वेळी सर्व बालकांची शाळा पूर्व
तयारी करून घेणे हि बालकांच्या पुढील शिक्षणासाठीचा पाया म्हणून खूप महत्वाची
असते.
शाळा
पूर्व तयारी अंतर्गत शिक्षण मार्गदर्शिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
पुणे यांचेकडून तयार करण्यात आलेली आहे. यात बालकांची शाळा पूर्व तयारी व्हावी
यासाठी कृतीपात्रिका देण्यात आलेल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी शिक्षक व पालक
त्यांना मदत करू शकतात. या कृतीपात्रिका आनंददायी असल्याने बालकाला शाळेत नियमित येण्यासाठी
व शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
विद्याप्रवेश कार्यक्रम राबविण्याचा कालावधी :-
संपूर्ण महाराष्ट्र :- २० जुन २०२२ ते १० सप्टेंबर २०२२
विदर्भ :- ०४ जुलै २०२२ ते २४ सप्टेंबर २०२२
एकूण ४६ कृतीपात्रिका मुलांकडून सोडवून घ्यायच्या आहेत. त्यातून मुलांना नक्कीच आनंददायी शिक्षण मिळणार आहे.
0 Comments