मतदान ओळखपत्र व आधार कार्ड लिंक करा घरच्या घरी ( Voter ID and Adhar link at home )

 



सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. आता आधार आणि मतदान ओळखपत्र लिंक गरजेचे आहे. महाराष्ट्रात १ ऑगस्टपासून याच्याशी संबंधित कॅम्पेन सुरू होणार आहे. याबाबत महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी माहिती दिली आहे. त्यांनी माहिती दिली की, मतदारांची ओळख पटवणे आणि मतदार यादीमधील नावांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी असे केले जाईल. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी कॅम्पस लावले आहेत. ज्यामुळे आधार-मतदान ओळखपत्र लिंक करण्याची प्रोसेस सोपी होईल. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन देखील प्रोसेस पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

Voter Helpline App डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.





NVSP portal द्वारे करू शकता लिंक

  • आधार – मतदान ओळखपत्र लिंक करण्यासाठी सर्वात प्रथम NVSP (नॅशनल वोटर सर्विस पोर्टल) ची वेबसाइट https://www.nvsp.in/ जावे लागेल. त्यानंतर येथे लॉग इन करा.
  • आता होम पेजवर दिसणाऱ्या Search in Electoral Roll वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
  • येथे तुम्हाला मतदान ओळखपत्र, खासगी माहिती, EPIC नंबर आणि स्टेट टाकून सर्च करावे लागेल.
  • तुम्हाला येथे Feed Aadhaar No चा पर्याय मिळेल. यावर क्लिक करा.
  • आता एक पॉप-अप विंडो ओपन होईल. यात तुमच्या आधार कार्डची माहिती द्यावी लागेल.
  • पुढे तुम्हाला महत्त्वाची माहिती भरावी लागेल व ओळख व्हेरिफाय करावी लागेल. त्यानंतर रजिस्टर्ड नंबर आणि ईमेलवर एक ओटीपी येईल.
  • ओटीपी टाकून सबमिटवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला एक नॉटिफिकेशन मिळेल, ज्यात आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक झाल्याची माहिती असेल.
Disclaimer :- 

सदर माहिती हि केवळ आपल्या माहितीसाठी येथे ठेवलेली आहे.

Post a Comment

2 Comments