वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदनीस मुदतवाढ
महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी करिता हे पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य या चार गटातील शिक्षकांनी नोंदणी करावयाची आहे.
ऑनलाईन वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाकडे सोपविण्यात आलेली आहे. यानुसार मागील शैक्षणिक वर्षामध्ये दिनांक १ जुन २०२२ रोजी राज्यातील ९४, ५४२ शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष सन २०२३ - २०२४ मध्ये संदर्भ क्रमांक २ अन्वयेच्या पत्रानुसार दिनांक २९ मे २०२३ ते १२ जून २०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन प्रशिक्षणासाठी ऑनलाईन स्वरूपामध्ये नावनोंदणी करणेसाठी मुदत देण्यात आली होती.
तथापि संदर्भ क्रमांक ३ अन्वये राज्यातील विविध प्राथमिक शिक्षक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना यांचेमार्फत प्रशिक्षण नावनोंदणी साठी मुदतवाढ देणेबाबतची निवेदने या कार्यालयास सादर केलेली आहेत. सदरच्या सर्व प्राप्त निवेदनांचा विचार करता प्रशिक्षण नावनोंदणीसाठी सद्यस्थितीमध्ये दिनांक १३ जून २०२३ ते २० जून २०२३ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी..
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदनीस मुदतवाढ संबंधीचे पत्र खाली दिले आहे. त्याचे सविस्तर वाचन करावे.
या संदर्भात सूचना पुढीलप्रमाणे :-
- वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी करणेसाठी परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी.
- दि. ३१ मार्च २०२४ रोजी १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
- दि. ३१ मार्च२०२४ रोजी २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
- प्रशिक्षण नोंदणी दि. २९ मे २०२३ ते १२ जुन २०२३ पर्यत देण्यात आलेली आहे.
- सदरचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याबात नोंदणीनंतर पुढील सूचना संबंधिताना ई-मेलद्वारे देण्यात येतील.
- प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत. गट क्र. १ - प्राथमिक गट , गट क्र. २ - माध्यमिक गट, गट क्र. ३ - उच्च माध्यमिक गट, गट क्र. ४ - अध्यापक विद्यालय गट
- प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
- नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकवर तत्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा.
- प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय.डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल आय.डी. वर पाठविण्यात येईल.
- नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण महती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास " माहितीत बदल करा." या बटनावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.
- प्रस्तुत प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्हासाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.
- सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी २०००/- रु. शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करणे आवश्यक आहे.
- यासाठी स्वताच्या बँक खात्याचा सर्व तपशील सोबत ठेवावा.
- नोंदणी अर्ज करताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास स्वताच्या रजिस्टर इमेल वरून trainingsupport@maa.ac.in या ई-मेल आयडीवर संपर्क करावा.
0 Comments