इयत्ता ६ वी ते ८ वी शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर | std sixth to eighth shaley poshan ahar calculator




प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरिता केंद्र पुरस्कृत  शालेय पोषण आहार योजना १५ ऑगस्ट १९९५ पासून राज्यात सुरू करण्यात आली आहे.

    प्रत्येक शाळेत शालेय पोषण आहार शिजवून दिला जातो.  शालेय पोषण आहार योजना रावबत असताना त्या योजनेची माहिती आपणास असणे मह्तवाचे असते. शालेय पोषण आहार योजनेत धान्य धान्यादी प्रमाण किती असते, प्रति विद्यार्थी आपणास किती शालेय पोषण आहार अनुदान प्राप्त होते, प्रति विद्यार्थी किती धान्य दिले पाहिजेधान्यादीचे प्रमाण किती ठेवावे याविषयीची माहिती आपणास ठेवणे आवश्यक असते

दररोज आपणास उपस्थित विद्यार्थ्याप्रमाणे शालेय पोषण आहाराच्या नोंदी ठेवाव्या लागतात. त्या ठेवताना दररोजची बदलणारी उपस्थिती यामुळे प्रमाण काढण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे आमच्या ukguruji टीम मार्फत दररोज शालेय पोषण आहाराच्या नोंदी ठेवणे एकदम सोपे काम केले आहे. यासाठी आम्ही Shaley poshan ahar calculator शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर तयार केले आहे. याचा फायदा नक्कीच महाराष्ट्रातील सर्व शाळेतील शालेय पोषण आहार नोंदी ठेवणाऱ्या शिक्षकांना व योजनेला होणार आहे. यासाठी आपल्या खालील प्रमाणे काम करावे लागणार आहे. 

  • Ø  प्रथम आपणास इयत्ता १ ली ते ५ वी किंवा 6 वी ते ८ वी यापैकी एक tab निवडावी लागणार आहे.
  • Ø तदनंतर ज्या दिवसाचे प्रमाण पाहायचे आहे तो वार निवडा.
  • Ø त्यानंतर इयत्ता १ ली ते ५ वी वर्गाचे आजची उपस्थिती टाका व GO बटनावर क्लिक करा.
  • Ø  इयत्ता ६ वी ते ८ वी वर्गाचे काढायचे असल्यास त्या दिवशीची उपस्थिती टाका व GO बटनावर क्लिक करा.
  • Ø तुम्हाला एका सेकंदात तांदूळ, धान्यादि माल यांचे प्रमाण एका सेकंदात दिसेल.
  • Ø तसेच  इंधन, भाजीपाला व पूरक आहार याचा खर्च रक्कम त्या दिवसाची एका सेकंदात कळेल. 
  • यासाठी खालील वार  निवडा. 


वार

लिंक

सोमवार

Click Here

मंगळवार

Click Here

बुधवार

Click Here

गुरुवार  

Click Here

शुक्रवार  

Click Here

शनिवार

Click Here



        कॅल्क्युलेटर कसे वापरावे ते खालील व्हिडीओ मध्ये पहा.  




मागील मेन पेजवर जाण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.  करा. .  



शालेय पोषण आहार योजना आता PM POSHAN Pradhan Mantri Poshan Shakti Nirman (PM POSHAN) -

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्याच्या पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्याथ्र्यांची गळती थांबविण्याकरिता केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना दि. १५ ऑगस्ट, १९९५ पासून राज्यात सुरू करण्यात आली आहे.केंद्र शासनाने सदर योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM POSHAN) असे करुन प्रस्तुत योजनेच्या पंचवार्षिक (सन २०२१ २२ ते २०२५-२६) आराखड्यास मान्यता दिल्याचे दि.०६ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांव्दारे कळविले आहे. त्यानुसार योजनेच्या नावात बदल करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

केंद्र शासनाने शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) असे केले असल्यामुळे यापुढे राज्यात शालेय पोषण आहार ही योजना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM POSHAN) म्हणून ओळखली जाईल. तसेच, केंद्र शासन निर्णय क्रमांक आयो-२०११/प्र.क्र.१४५/एस.डी.-३  शासनाने प्रस्तुत योजनेकरीता निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचना व इतर बाबी केंद्र शासनाच्या दि.०६ ऑक्टोंबर, २०२१ मधील पत्राप्रमाणे राहतील.सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२११०४१५२४१७३१२१ असा आहे.




Post a Comment

2 Comments