राज्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान राबविले जात आहे. दि. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालाधीत हे अभियान राबविले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांनी (All schools)यात सहभागी व्हावे,असे आवाहन महाराष्यांट्नीर शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी आणि त्यातून स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना १ लाखांपासून ते ५१ लाख रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यात तालुकास्तरावरील स्पर्धेत शासकीय व जिल्हा परिषदेच्या शाळांना प्रथम क्रमांकासाठी ३ लाख, द्वितीयसाठी २ लाख, तर तृतीयसाठी १ लाख रुपये पारितोषिक दिले जाईल
जिल्हास्तरावर प्रथम बक्षीस ११ लाख, द्वितीय ५ लाख, तृतीय ३ लाख, विभागस्तरावर प्रथम २१ लाख, द्वितीय ११ लाख आणि तृतीयसाठी ७ लाख रुपये, तर राज्य पातळीवर प्रथम ५१ लाख, द्वितीय २१ लाख आणि तृतीयसाठी ११ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनाही एवढेच बक्षीस दिले जाणार आहे.त्यामुळे खासगी शाळांनी सुध्दा यात सहभागी व्हावे,असेही आवाहन गायकवाड यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरणपूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, शाळेचे शिक्षक, माजी विद्यार्थी व पालक याच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे हे अभियानाचे उदिष्ट आहे.
माझी शाळा सुंदर शाळा याची ऑनलाईन नोंदणी कशी करावी याची pdf खाली आपण पाहू शकता.
माझी शाळा सुंदर शाळा याची ऑनलाईन नोंदणी कशी करावी याची pdf डाउनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.
माझी शाळा सुंदर शाळा या संदर्भात आपणास हवी असलेली माहिती मिळविण्यासाठी त्या माहिती समोरील click here बटनाला क्लिक करा.
अ.क्र. | तपशील | लिंक |
1. | माझी शाळा सुंदर शाळा शासन निर्णय | |
2. | माझी शाळा सुंदर शाळा आवश्यक फोटो | |
3. | ऑनलाईन नोंदणी कशी करावी ? | |
4. | माझी शाळा सुंदर शाळा गुणदान | |
5. | माझी शाळा सुंदर शाळा User Manual | |
6. | माझी शाळा सुंदर शाळा संपूर्ण व्हिडीओ |
Disclaimer : सदरील माहिती शिक्षकांना सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने येथे दिलेली आहे. सर्व हक्क शासनाच्या स्वाधीन आहेत.
0 Comments