लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. देशात सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. याच अनुषंगाने निवडणुक आयोगाच्या वतीने अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली असून, आपले नाव यादीत तपासून घ्यावे. आपले बहुमूल्य मत देऊन लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा, असे सर्वांस आवाहन करण्यात येत आहे
देशात दिनांक 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात दिनांक 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. संपूर्ण लोकसभा निवडणूक निकाल 4 जून रोजी असेल.
या संदर्भात आपण खाली व्हिडीओ पाहू शकता.
Voter slip कशी मिळवावी यासंदर्भात माहिती घेण्यासाठी इथे क्लिक करा.
मतदार यादी 2024 मध्ये स्वत:चं नाव का तपासावं?
Election voter list
आता तुम्हाला वाटेल की मागच्या वेळी तर मतदार यादीत आमचं नाव होतं, मग आता पुन्हा चेक करण्याची काय गरज? तर तुमच्या माहितीसाठी - मतदार याद्या या दरवेळी अपडेट होत असतात, दरवेळी यादीत काही बदल होत असतात. काही वेळा मतदार यादीतील तुमचं नाव चुकू शकतं किंवा तुमच्या पत्त्यात काही बदल झालेला असू शकतो. काही वेळा चुकीने तुमचं नाव वगळलं जाऊ शकतं, त्यामुळे या सर्वाची खबरदारी म्हणून तुम्ही मतदार यादीत तुमचं नाव चेक केलं पाहिजे, अन्यथा ऐन वेळी तुम्हाला मतदान करता येणार नाही. मतदार यादीतील तुमच्या तपशीलात काही दुरुस्ती असल्यास तुम्ही त्या निवडणुकाच्या 10 दिवस आधीपर्यंत बदलून घेऊ शकता.
मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधाल ?
1. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत तुमचं नाव शोधू शकता. त्यासाठी सर्वप्रथम या लिंकवर क्लिक करा -
2. वेबसाईटच्या मुखपृष्ठावरील 'Search in Electoral Roll' टॅबवर क्लिक करा.
3. 'Search by EPIC'
आता वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला 3 पर्याय दिसतील. त्यातील 'Search by EPIC', या पैकी एका पर्यायावर क्लिक करा.
- यात सुरुवातीला भाषा निवडावी
- तुम्हाला सुरवातीला epic no टाकावा लागेल.
- त्यानंतर राज्य निवडावे लागेल
- शेवटी captcha टाकावा व सर्च करावा. आपली माहिती दिसेल.
4. 'Search by Details'
आता वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला 3 पर्याय दिसतील. 'Search by Details', या पर्यायावर क्लिक करा.
- यात सुरुवातीला राज्य व भाषा निवडावी
- सुरवातीला तुमचे प्रथम नाव व शेवटचे नाव टाका.
- त्यानंतर नातेवाईकाचे नाव व शेवटचे नाव निवडावे.
- जन्मतारीख टाकावी किंवा वय निवडावे. लिंग निवडावे
- त्यानंतर जिल्हा व विधानसभा क्षेत्र निवडावे लागेल.
- शेवटी captcha टाकावा व सर्च करावा. आपली माहिती दिसेल.
4. 'Search by mobile number'
आता वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला 3 पर्याय दिसतील. 'Search by mobile', या पर्यायावर क्लिक करा.
- यात सुरुवातीला राज्य व भाषा निवडावी
- सुरवातीला तुमचा मोबाईल नंबर टाकावा
- शेवटी captcha टाकावा व सर्च करावा. आपली माहिती दिसेल.
यानंतर आता खाली मतदार यादीतील तुमचं नाव, EPIC Number आणि सर्व माहिती दिसेल.
जर सर्च केल्यानंतरही तुम्हाला तुमचं नाव दिसत नसेल तर तुम्ही भरलेले तपशील एकदा तपासून पाहावे किंवा तीनपैकी इतर दोन पर्यायाचा वापर करावा. तरीही नाव न दिसल्यास राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा.
आपल्या गावातील प्रत्येक प्रभागाची यादी पाहण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.
मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधावं याची सविस्तर माहिती खाली व्हिडीओ मध्ये पाहू शकता.
5 Comments
sachinbijule@gmail.com
ReplyDeletehi
ReplyDelete9922360081
ReplyDelete9922360081
ReplyDeleteसंजय अशोक शिंदे
ReplyDelete